मराठी सिनेसृष्टीतील ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री पूजा सांवतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
‘क्षणभर विश्रांती’ सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलेली अभिनेत्री पूजा सावंत आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाली आहे.
अभिनेता विद्युत जामवालसोबत ती ‘जंगली’ सिनेमात झळकणार आहे.
‘जंगली’ हा एका वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यावरील सिनेमा आहे. प्रवासामध्ये हत्तींची शिकार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्या विरोधात संघर्ष करणारा नायक विद्युतने साकारला आहे.
या सिनेमात पूजादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘जंगली पिक्चर्स’ निर्मित आणि चक रसेल दिग्दर्शित ‘जंगली’ हा सिनेमा येत्या 5 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.