Mon. Jul 13th, 2020

कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीवरून अभिनेते प्रशांत दामले नाराज…

कालिदास कलामंदिराची भाडेवाढ करताना आयुक्तांनी काही तरी गणित मांडले असणार ना, मग त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा नाशिकमध्ये नाटक बंद हाच एकमेव उपाय असल्याचे मत नाट्यकलावंत प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.

नाट्यगृह खरे तर कमाईचे साधन नसते ती शहराची गरज असते. परंतु आता त्याला पर्याय काय, असा प्रश्नही त्यांनी व्यक्त केला.

शहराचा सांस्कृतिक आणि विशेषत: नाट्य चळवळीला पूरक असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे भाडे पाचपट वाढविण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही उद्विग्न भावना व्यक्त केली.

कालिदास कलामंदिराची दुरवस्था झाल्यानंतर नाटके सादर करणाऱ्या आणि कलावंतांना होणाऱ्या त्रासाबद्दल प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर व्यथा मांडली होती. त्यामुळे महापालिका खडबडून जागी झाली होती. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पात महाकवी कालिदास कलामंदिराचा विषय समाविष्ट करून त्याचे रूपडे पालटले. परंतु आता महापालिकेने त्याचे दर वाढविले आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मत व्यक्त करताना नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *