Sun. Feb 28th, 2021

रणवीर सिंगचा उत्साह चाहत्यांवर पडला भारी!

बॉलिवूडचा मोस्ट एनर्जेटिक अ‍ॅक्टर रणवीर सिंग त्याच्या एनर्जीमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतो, पण कधीकधी हा ‘जोश’ही भारी पडतोच. अशीच एक घटना रणबीर आणि त्याच्या चाहत्याबरोंबर घडली  आहे.

त्याच्या ‘डाय हार्ट’ चाहत्यांना याचे परिणाम भोगावे लागलेत. झाले असे की, ‘गली बॉय’च्या एका प्रमोशनदरम्यान रणवीरचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता, या उत्साहाच्या भरात त्याने थेट समोर उभ्या गर्दीत उडी घेतली.

अचानक गर्दीत वरून उडी घेतल्याने त्याच्या अनेक चाहत्यांना इजा पोहोचली.

रणवीरचा टाईमिंग चुकला आणि नेमक्या रणवीरला मोबाईलमध्ये कॅच करू पाहणा-या चार दोन तरूणींना दुखापत झाली.

या घटनेचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. यात रणवीरच्या अचानक उडी घेतल्याने काही मुली घाबरून खाली बसलेल्या दिसत आहेत.

या घटनेवरून रणवीर ट्रोलही होतोय. अनेकांनी रणवीरला असला बालिशपणा न करण्याचा सल्ला दिला आहे.

रणवीर एक परिपक्व अभिनेता आहे. त्याला तसेच वागायला हवे, असे एका युजरने लिहिले आहे.

या प्रकारानंतर रणवीरने मनाचा मोठेपणा दाखवत, यापुढे सावध असेल. तुमच्या प्रेमासाठी आणि सल्ल्यासाठी धन्यवाद, असे म्हटले आहे.

रणवीरचा ‘गली बॉय’ हा सिनेमा येत्या 14 फेबु्रवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमात पहिल्यांदाच रणवीर आणि आलिया भट्टची जोडी एकत्र झळकणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *