Fri. Dec 3rd, 2021

अभिनेता सोनू सूद याला कोरोनाची लागण

कोरोनाच्या संकटात अनेकांच्या मदतीसाठी निस्वार्थपणे धावून आलेला आणि अनेकांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद याला कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः सोनू सूद याने याबाबतची माहिती आपल्या इंस्टाग्रामवरून दिली आहे.

सोनू सूदने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यात, ‘ नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी कोव्हिड १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी विलगीकरणात आहे. काळजी करण्याचे कारण नाही. उलट, तुमच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी माझ्याकडे आता आधीपेक्षा जास्त वेळ असेल. लक्षात ठेवा, कोणत्याही अडचणीत.मी तुमच्यासोबत आहे’ असं सोनू सूदने म्हटलं आहे. सोनू सूदला कोरोना झाल्याचे समजताच त्याच्या चाहत्यांनी त्याला काळजी घ्यायला सांगण्यास सुरुवात केली आहे. तसेच तो लवकर बरा व्हावा, म्हणून प्रार्थना करत आहेत.

कोरोना काळात सोनू सूदने देवदूत बनून लोकांना प्रचंड मदत केली आहे. अनेकांना त्याने त्यांच्या घरी परतण्यासाठी मदत केली होती. इंदौरमधील काही रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरची नितांत गरज होती. त्यावेळी त्याने १० ऑक्सिजन सिलेंडर पुरवले असून काहींंना इंजेक्शन देखील पुरवले आहेत. कोरोना काळात ‘मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा’ असे देखील तो त्याच्या चाहत्यांना सांगत आहे. इंदौरमधील मंडळीनी सोशल मीडियाद्वारे त्याचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *