अभिनेत्री प्रियंका चोप्रा बनली आई

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आई बनली असल्याची गोड बातमी प्रियंकाने चाहत्यांना दिली आहे. प्रियंकाने सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला आहे.
२०१८मध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा अमेरिकेचा गायक निक जोनससोबत विवाहबंधनात अडकली. या दाम्पत्याने नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. आता पुन्हा एकदा या दाम्पत्याने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. प्रियंका चोप्राने ट्वटि करत आई बनली असल्याची माहिती दिली आहे. प्रियंकाने ट्विट केले की, ‘सरोगसीच्या माध्यमातून आम्हाला आपत्यप्राप्ती झाली आहे. ही आनंदाची बातमी आम्ही सामायिक करत आहोत. हे क्षण आमच्यासाठी खास आहेत आणि आता आम्हाला प्रायव्हसिची गरज आहे. आम्हाला कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. त्यामुळे आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे.’ असे आवाहन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे.
भारतातील अनेक कलाकारांनी सरोगसी हा पर्याय निवडला आहे. त्यात आता अभिनेत्री प्रियंका चोप्राचे नाव यादीत जोडले आहे. प्रियंकाने दिलेल्या या गोड बातमीमुळे चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
What is the best way to start a Blog for profit?