Thu. Apr 15th, 2021

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जवळकर यांचं निधन

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जवळकर यांचं आज निधन झालं.वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.७० व्या दशकात त्यांनी मुख्य अभिनेत्री आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.त्यांनी तब्बल १०० चित्रपटांमध्ये काम केलं.

शशिकला यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ रोजी सोलापुरात झाला होता. शशिकला यांच्या जीवनात अनेक चढा-उतार आले. त्यांचे वडिल मोठे उद्योगपती होते. शशिकला यांना एकूण सहा भावंडं होती.वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शशिकला नृत्य, गायन आणि अभिनय करू लागलया. त्यांना ‘झीनत’ या शौकत रिझवी यांच्या चित्रपटात काम मिळालं. नंतर त्यांच्याकडे तत्कालीन निर्माते, पी. एन. अरोरा, अमिया चक्रवर्ती आणि व्ही. शांताराम यांचे लक्ष गेलं. १९५३ साली शांताराम यांनी त्यांना‘तीन बत्ती चार रास्ता’ या चित्रपटात काम दिलं. वयाच्या विसाव्या वर्षी सहगल कुटुंबातील ओमप्रकाश सहगल बरोबर त्यांचा विवाह झाला.

कुलाबा येथील चर्चमध्ये शोकसभा ठेवण्यात येणार आहे. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. विशेष म्हणजे प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करता करता त्यांनी खलनायिका म्हणून वेगळीच छाप पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *