Fri. Sep 30th, 2022

या अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना दुसऱ्या अभिनेत्रींच्या पतीला डेट करण्याची इच्छा आहे आणि ही इच्छा या अभिनेत्री उघडपणे बोलून देखील दाखवतात. अभिनेत्री भूमी पेडणेकर हिला एका मुलाखतीदरम्यान डेटींगबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर या प्रश्नांवर भूमीने बेधडकपणे उत्तर दिले. या मुलाखतीच्या माध्यमातून तिने तिच्या सर्व इच्छा व्यक्त केल्या असून मुलाखती दरम्यान तिला विचारण्यात आली की तुला बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रीच्या पतीला डेट करायला आवडेल. या प्रश्नावर भूमी म्हणाली ‘मला अभिनेत्री अनुष्का शर्माचा पती आणि क्रिकेटर विराट कोहलीला डेट करायला आवडेल. त्यानंतर मला अभिनेत्री प्रियंका चोप्राचा पती आणि गायक निक जोनसला डेट करायला आवडेल.’ पुढे भूमी म्हणाली, ‘निक जोनस फार छान आहे. मी लहानपणापासून त्यांचे गाणे ऐकते. निक प्रचंड क्यूट आहे.’ सध्या भूमीचं हे वक्तव्य तुफान चर्चेत आहे. तसेच भूमी ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. यामुळेच भूमी या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर भूमीचा चाहता वर्ग फार मोठी आहे. भूमीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, भूमी ‘दुर्गामती’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. कोरोना महामारीमुळे चित्रपट रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होवू शकला नाही. त्यामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. याशिवाय भूमी ‘मिस्टर लेले’, ‘बधाई दो’ चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.