Wed. Aug 5th, 2020

‘पुरुषाला नपुंसक म्हणणं हा गुन्हा!’

कोणत्याही पुरुषाला नपुंसक संबोधणं हा गुन्हा असून असं केल्यास तो पुरूष मानहानीचा दावा ठोकू शकतो. असं मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केलं आहे.

आंध्र प्रदेशातील एका महिलेने आपल्या पतीविरोधात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यावेळी आपला पती नपुंसक असल्याचा दावा तिने केला होता. या दाव्यामुळे चिडून तिच्या पतीने आपल्या पत्नीविरोधात भा.दं.वि. कलम 500 आणि 506 अंतर्गत अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. याविरोधात महिलेने मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं.

मुंबई हायकोर्टाने मात्र महिलेचा दावा फेटाळून लावला. कोणत्याही पुरुषाला अशा प्रकारे नपुंसक म्हणणं हे अपमानास्पद असल्याचं हायकोर्टाने स्पष्ट केलंय. त्यामुळे जर कुणी पुरुषाला नपुंसक म्हणत असेल, तर तो गुन्हा असून त्याविरोधात संबंधित पुरूष मानहानीचा दावा करू शकतो आणि त्याला नपुंसक संबोधणाऱ्यास तुरूंगवास घडू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *