Tue. Jul 14th, 2020

मानलेल्या बहिणीशीच विवाहबाह्य संबंध… समजताच पतीने केलं मित्रासोबत ‘हे’!

सर्वोच्च न्यायालयाने कलम 497 रद्द केल्यानंतर विवाहबाह्य संबंध हा फौजदारी गुन्हा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. मात्र विवाहबाह्य संबंधांमुळे मात्र फौजदारी गुन्हे घडत असवल्याचं एक उदाहरण सिंधुदुर्गात पाहायला मिळालं. आपल्या पत्नीचे आपल्या मित्राशी विवाहबाह्य संबंध असल्याचं समजताच पतीने आपल्या मित्राचा हातच तोडून टाकल्याची घटना सिंधुदुर्गामध्ये घजली.

नेमकं काय घडलं?

मंगेश आणि महेश हे दोन मित्र मुंबई येथील बेस्ट मध्ये चालक आणि वाहक पदावर कार्यरत होते. त्यांची मैत्री वाढत होती. कालांतराने महेशचे मंगेशच्या घरी येणे वाढू लागले आणि माहेशचे मंगेशच्या पत्नीशी सूर जुळले. गेली चार वर्षं हे प्रेमसंबंध सुरू होते.

अचानक याची माहिती मंगेशला मिळाली.

गुरुवारी मंगेश आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे म्हाळासाठी एकटाच आला.

नंतर त्याने शनिवारी आपल्या पत्नीला महेश सोबत दोडामार्गला येण्यास सांगितले.

महेश आणि मंगेश ची पत्नी दोडामार्ग मध्ये दाखल झाले.

दुपारी म्हाळाचे जेवण आवरल्यानंतर मंगेशने दोघांकडेही प्रेमसंबंधाबाबत विचारणा केली.

यावेळी दोघांचीही सकारात्मक भूमिका पाहून मंगेशने आपल्या पत्नीला मारझोड करण्यास सुरुवात केली.

याचदरम्यान महेशचे दोन्ही हात बांधून त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि लाकडी साहित्याचा आधार घेत कोयत्याने त्याच्या हातावर वार केला.

हा वार एवढा भीषण होता की महेशच्या हाताचे दोन तुकडे झाले.

त्यानंतर जखमी महेशला मंगेश ने गाडीत घालून गोवा बांबोळी येथील रुग्णालयात दाखल केले.

 

जातेवेळी तुटलेला हात गाडीतून बाहेर फेकून दिला.

गोवा पोलिसांकडून घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात भेट देत आरोपी मंगेश याला ताब्यात घेतले.

तब्बल ५ दिवसानंतर महेश याचा तोडलेला हात पोलिसांना मंगळवारी सायकांळी सापडला. तर पोलिसांनी महेश याच्या घराच्या देवखोलीतून कोयता आणि वापरण्यात आलेली गाडी ताब्यात घेतली.

त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

 

अनैतिक संंबंध लपवण्यासाठी करायचा बहीण मानल्याचा कांगावा 

 

आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी महेश मंगेशच्या पत्नीला आपली मानलेली बहीण असल्याचा कांगावा करायचा. पण अखेर सत्य बाहेर आलेच. एका मित्राने गद्दारी केली तर एका मित्राने त्याचा बदला घेतला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *