Mon. May 17th, 2021

ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी उत्तम उपाय

कोविड -१९ चे रूग्ण जे गृह विलगीकरणात आहेत त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या कारणास्तव ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास डॉक्टरांनी स्वत: लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जर रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तो प्रोनिंग पद्धत वापरू शकतो. गृह विलगीकरणात राहणा-या रुग्णांसाठी प्रोनिंग खूपच उपयुक्त आहे. यामुळे आयसीयूमध्ये राहणा-या रूग्णांमध्ये चांगले फायदे दिसून आले आहेत.

गोरखपूर येथील ८२ वर्षीय विद्यादेवी यांनी प्रोनिंगच्या सहाय्याने आजारावर मात केली. तसेच एका १०५ वर्षीय हरी मोहन यांनी देखील प्रोनिंगमुळे कोरोनावर मात केली आहे. हरी मोहन म्हणाले की संपूर्ण कुटुंब संक्रमित असूनही त्यांनी सकारात्मक मानसिकता ठेवण्याचा प्रयत्न केला आणि सल्ल्यानुसार औषधे घेतली. 105 वर्षीय व्यक्ती आणि त्यांची 95 वर्षीय पत्नी देखील कोविडमधून बरे झाले.

कोरोनाच्या दुसर्यात लाटेमुळे परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनवरून गोंधळाचं वातावरण सुरू आहे. कोरोनाच्या रूग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. पण ऑक्सिजनअभावी दररोज कितीतरी रुग्ण दगावत आहेत. ज्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे आणि जे रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत त्यांच्यासाठी आरोग्य मंत्रालयाने प्रोनिंगच्या विविध पद्धती सुचवल्या आहेत. चला तर जाणून घेऊया आरोग्य मंत्रालयाने सुचवलेला हा उपाय प्रोनिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कसे करावं…

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *