अमरावतीनंतर दर्यापूरयेथील पुतळा हटवला

राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कारवाई सुरूच आहे. अमरातवतीमध्ये आमदार रवी राणा यांनी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर आता दर्यापूरयेथील महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे.
रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दर्यापूर येथे पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत शिवप्रेमींनी उभारलेला शिवपुतळा हटवला. त्यामुळे याप्रकरणी शिवप्रेमींनी काळ्या फिती दाखवत निषेध व्यक्त केला आहे.
अमरावती जिल्ह्यानंतर दर्यापूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यामुळे शिवपुतळ्यांवरील कारवी सुरूच असल्याचे समोर आले आहे. दर्यापूरयेथील शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृत असल्यामुळे हा पुतळा हटवण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष
अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसोबत संघर्ष पाहण्यास मिळाला. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला असून युवा स्वाभिमानच्या तीन नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आले.