कोरोना विषाणू संदर्भात चीनने केला ऑस्ट्रेलियावर आरोप
चीनने केला ऑस्ट्रेलियावर आरोप…

कोरोनामुळे संपुर्ण जगात भितीचं वातावरण आहे. काही महिन्यापूर्वी कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घालण्यास सुरूवात केली होती. अनेक देश यावरील लस विकसित करण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत.
या व्हायरसवर लवकरात लवकर कशी लस मिळेल याकडे संपुर्ण जगाच लक्ष लागलं आहे. परंतु अशा परिस्थितीतही चीननं अमेरिका आणि त्यानंतर भारतातून कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावसाठी पसरल्याचा आरोप केला होता.
त्यानंतर चीनने इटलीसोबतच जगाच्या इतर भागात कोरोना विषाणू पसरला असल्याचा दावाही केला होता. आता चीनने ऑस्ट्रेलियाला धारेवर धरलं आहे. चीन आता ऑस्ट्रेलियावर आरोप प्रत्यारोप करतांना दिसत आहे मात्र संपूर्ण जगाला चीनची वाट बाजू माहीत आहे.
त्यामुळे चीनला आता जगभरात शंकेच्या नजरेने बघितल्या जात आहे. वुहानमधून कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला आहे हे निश्चित झालं आहे. तरी यामधून चीन स्वतःचा करतांना दिसत आहे