Wed. Aug 10th, 2022

राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ वर भाजपाचे ‘बघाच तो व्हिडीओ’

राज ठाकरे यांच्या ‘ लाव रे तो व्हिडीओ ‘ चा भाजपाने चांगलाच धसका घेतलेला दिसतोय. त्यामुळे राज ठाकरेंना त्यांच्याच शैलीत उत्तर देण्यासाठी भाजपाने आता ‘ बघाच तो व्हिडीओ ‘ ही सभा आयोजित केली आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ही सभा झाली आहे. भाजपावर टीकेची झोड उठवणाऱ्या राज ठाकरेंना भाजपाने त्यांचे काँग्रेसवरील टीकेचे व्हिडीओ तसेच इतरही व्हिडीओ दाखवले आहेत. यावेळी राज यांच्याच शैलीमध्ये व्हिडीओ दाखवत प्रत्येक व्हिडीओंचा खरेखोटेपणा स्पष्ट करत आशिष शेलार हे भाजपकडून बॅटिंग करताना दिसत होते.यावेळी राहूल गांधी, अजित पवारांवरील व्हिडीओ दाखवण्यात आले. सुशिलकुमार, छगन भुजबळांच्याही नकलाचे व्हिडीओ देखिल दाखवण्यात आले.

आता भाजपकडून ‘ बघाच तो व्हिडीओ’

मित्रा, खरंच तू चुकलास असे म्हणत भाजपाचे आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला.

32 वेगवेगळ्या महत्वाच्या प्रकरणांत राज ठाकरे खोटं बोलले.
राज ठाकरे अर्धवट बातम्यांवर आधारीत प्रचार  करत आहेत.
राज ठाकरेंनी दाखवलेल्या खोट्या बातम्यांची सत्यता आम्ही दाखवणार आहोत.
आम्ही सत्याच्य़ा आधारावर राजकारण करतो असा दावा आशिष शेलार यांना केला आहे.

मोदींवरच्या टीकेंना प्रत्युत्तर

खोटं बोल रेटून बोल हे आपल्याकडून महाराष्ट्र शिकतोय

बदल हवा… पण माणसानं किती बदलावं…

एकाच व्यक्तीबद्दल मतांमध्ये एवढा बदल कसा झाला.
मोदींना प्रश्न विचारण्याआधी त्यांचं राज्यातलं सामर्थ्य बघा.
मनसेच्या स्थापनेवेळी असलेले नेते आज सोडून गेलेत. अशी टीका ही शेलार यांनी केली आहे.

माध्यमांची मुस्कटदाबी

राज ठाकरे म्हणतात आम्ही माध्यमांची मुस्कटदाबी केली
असं असतं तर गेल्या २० दिवसांत सर्व चॅनेल्सनं तुम्हाला सर्वात जास्त दाखवल आहे.
राज ठाकरे एका दिवसात 130 मिनीट तुमच्या बातम्या दाखवल्या जातात.

अनधिकृत  व्हिडीओंना  उत्तर देणार नाही

भाजपशी संबंध नसलेल्या अकाऊंटसवरुन व्हिडीओ काढून राज ठाकरेंनी वापरले.
आमच्याशी संबंधीत नसलेल्या अकाऊंटवर फिरणाऱ्या गोष्टींना उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही
यातून राज ठाकरे जनतेच्या डोळ्यात धुळफेक करु शकत नाहीत.
मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडीओ खोटा. हरिसाल गावाचा दाखवलेला व्हिडीओ खोटा.
ज्यानं एक झाडही दत्तक घेतलं नाही तो दत्तक घेतलेल्या गावांबद्दल बोलतोय.
गंगा सफाई झाली नाही हा दावाही खोटा आहे.

नोटबंदीच्या टीकेवर स्पष्टीकरण

नोटबंदीच्या आधी काळा पैसा जमा करण्याची विनंती सरकारने केली होती.
पण कुणी ही काळापैसा जमा केला नाही म्हणून नोटा बंदी करावी लागली.
नोटाबंदी मुळे 3 लाख 64  हजार बोगस कंपन्या बंद झाल्या.
पूर्वी कर संकलन दर 9 % होता जो नंतर 18 % वर गेला.
राज ठाकरे आम्ही आपल्याला चॅलेंज देतो आपण नोटा बंदी चा घोटाळा दाखवा आम्ही चर्चेला तयार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.