Fri. Aug 14th, 2020

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर खासदार संभाजी राजेंचं उपोषण मागे

खासदार संभाजी राजेंनी उपोषण मागे घेतलं आहे. प्रमुख तीन मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी राजेंना फोन केला.

फोन करुन सारथीची स्वायत्ता कायम राहील, असे आश्वासन दिले. यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं.

सारथीची स्वायत्ता कायम राखण्यासाठी आणि अन्य मागण्यासाठी आज सकाळपासून संभाजीराजेंनी या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली होती.

यावेळी मंत्री एकनाथ शिंदेंनी संभाजी राजेंची मनधरणी केली. सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं.

खासदार संभाजी राजेंच्या भाषणातील मुद्दे

  • राजकारण नाही, समाजकारणासाठी आलोय.
  • सारथी संस्थेची स्वायत्ता कायम रहावी.
  • विद्यार्थ्यांना मदत मिळणार नसेल, तर सारथी हवी कशाला ?
  • सारथी मोडून काढण्याचं कारस्थान.
  • एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आल्यानं बरं वाटलं.

एकनाथ शिंदेच्या भाषणातील मुद्दे

संभाजीराजे एवढं मोठं व्यक्तीमत्व असूनही समाजासाठी रस्त्यावर उतरतात हे पाहून खूप नवल वाटते- एकनाथ शिंदे

  • मराठा समाजातील आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा निर्णय झालेला आहे. एक कमिटी नेमून त्याबाबद्दलचा आदेश देण्यात येईल.

सरकारचा निर्णय सारथीच्या बाजूचाच आहे- एकनाथ शिंदे

  • जे. पी. गुप्ता यांना तात्काळ बाजूला करणार.
  • जे. पी. गुप्तांनी काढलेले सर्व शासन निर्णय रद्द होणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *