काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन
अहमद पटेल यांनी घेतला वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन झाले. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, वयाच्या 71 वर्षांचे त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली असून पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला.
उपचारादरम्यान त्यांचे काही अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं, त्यानंतर त्यांच्या शरीराचे अनेक अवयव निकामी होत गेले आणि त्याची प्रकृती आणखी खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची माहिती अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विटरद्वारे दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून चांगले काम केलं होतं
त्यांच्या मृत्यूनंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी टि्वटरवर त्यांना श्रद्धांजली वाहिली. अहमद पटेल यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्वीट केलं की, “अहमद पटेल आपल्यातून निघून गेले. एक अभिन्न मित्र विश्वसनीय साथी निघून गेलाय. आम्ही दोघंही 1977 पासून एकत्र होतो. ते लोकसभेत पोहोचले. मी विधानसभेत. आम्हा सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ते प्रत्येक राजकीय आजाराचं औषध होते. मृदुभाषी, व्यवहार कुशल आणि सदैव हसतमुख राहणं हिच त्यांची ओळख होती. अहमद पटेल यांच्या मृत्यूने काँग्रेसला एक धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक नेत्यानी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.