Fri. Jan 21st, 2022

मुंबईतील हवेचा दर्जा घसरला

  मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अशातच मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे. हवेत घातक सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढल्याने कुलाबा, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल, मालाड येथील हवेची गुणवत्ता मंगळवारी ‘अतिशय वाईट’ या श्रेणीत होती.

  मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. हवेचा वेग मंदावला असून, हवेत ‘पीएम २.५’चे (घातक सूक्ष्मकण)चे प्रमाण वाढले आहे. कुलाबा येथे मंगळवारी ‘पीएम २.५’चे (२.५ मायक्रोमीटर व्यासाचे अतिसूक्ष्मकण) प्रमाण ३५३ तर ‘पीएम १०’चे (१० मायक्रोमीटर व्यासाचे सूक्ष्मकण) प्रमाण २०४ होते. मालाड येथे हे प्रमाण अनुक्रमे ३२१ आणि १४७ होते. माझगाव येथे ‘पीएम १०’चे प्रमाण मध्यम स्तरावर होते; मात्र ‘पीएम २.५’चे प्रमाण ३३७ वर गेल्याने हवेचा दर्जा ‘अतिशय वाईट’ होता. वांद्रे-कुर्ला संकुल येथे ‘पीएम २.५’चे प्रमाण ३१३ तर ‘पीएम १०’चे प्रमाण २६३ होते. या सर्व ठिकाणी आज, बुधवारीही हवा ‘अतिशय वाईट’ दर्जाची असण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *