Sat. Jan 16th, 2021

“जे आपल्या आई वडिलांचे ऐकत नाही ते जनतेचं काय ऐकणार?” अजित पवार यांचा टोला!

“निवडणुकीच्या काळात अनेकजण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात, पण दुसऱ्या पक्षात जाणारा हा मास लीडर असेल तर फरक पडतो. सुजय विखे पाटील जाण्याने काही परिणाम होत नाही”, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे. पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात पवार यांनी सुजय विखे पाटील यांच्या पक्षबदलावर आपलं मत मांडलं.

“जे आपल्या आई – वडिलांचे ऐकत नाही ते जनतेचं काय ऐकणार?” असा टोलाही अजित पवार सुजय विखे यांना लगावला.

 

‘मावळमधील नवख्या उमेदवारा’बद्दल भावनिक आवाहन!

आपल्या भाषणात तरुणांना संधी दिली पाहिजे असं अजित पवार म्हणाले.

मावळमधून नवखा उमेदवार उभा राहिला तर संभाळून घ्या, असं भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

सध्या पार्थ पवार हे पनवेल –उरणमध्ये दौरे करत आहेत.

याबाबत विचारले असता शीतावरून भाताची परीक्षा करू नका, असं सांगत पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत बोलण्यास टाळलं.

48 जागांमध्ये तरुणांना तसेच जेष्ठांना जागा देण्यात येईल, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

तसंच शरद पवार यांनी पुन्हा रिगणात उतरावं या नातू रोहित पवार यांनी केलेल्या आवाहनावरही त्यांनी उत्तर दिलं. पवार यांच्या घरात शरद पवार यांचा शब्द अंतिम असल्याचं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *