Thu. Jul 16th, 2020

अजिंक्‍य रहाणेच्‍या घरी नन्ही परीचं आगमन !

क्रिडा विश्वात अनेक घडामोडी घडत असतात.  भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं.

क्रिडा विश्वात अनेक घडामोडी घडत असतात.  भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं.अजिंक्यची पत्नी राधिकानं एका गोड मुलीला जन्म दिला आहे..भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगने आपल्या ट्विटरवरुन रहाणेला शुभेच्छा देत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली… दरम्यान अजिंक्य सध्या विशाखापट्टणमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत आहे.

याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी अजिंक्यनं राधिकाचे डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत लवकरच तो बाबा होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.

भारताचा फिरकीपटून हरभजन सिंगने अजिंक्य रहाणेला ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. हरभजनने म्हटलं, “अजिंक्य रहाणेला खुप शुभेच्छा. आशा करतो की आई आणि बाळ दोघेही छान असतील. त्यांच्या जीवनातील नवा सुंदर भाग सुरु होत आहे.” हरभजनच्या ट्वीटनंतर अजिंक्य आणि राधिकाला अनेक जण शुभेच्छा देत आहेत

अजिंक्य रहाणेने बालपणीची मैत्रिण राधिकासोबत 26 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबईत लग्न केलं होतं. अजिंक्य रहाणेनं आपण बाबा होणार असल्याची गुड न्यूज जुन महिन्यात दिली होती. त्याने सोशल मीडियावर राधिकासोबतचे काही फोटो शेअर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *