अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला – राऊत

महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या पाश्वभुमीवर अकालनीय घटना घडली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीसोबत बंड करून भाजपाला पाठींबा दिला आहे. यामुळे राज्याचे मुख्यमंत्रीपद पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले आहे. तसेच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे.
यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका करत आपले मत व्यक्त केले आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
अजित पवार काल रात्री पर्यंत आमच्या सोबत होते मात्र बैठकीत नजरेला नजर भिडवत नव्हते.
त्यांची बॉडी लँग्वेज संशयास्पद होती. अचानक बाहेर पडले आणि फोन बंद केला.
अजित पवारांनी शरद पवार यांना दगा दिला. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.
भाजपने अजित पवारांना धमक्या देऊन आमदार फोडले आहेत. असा आरोप त्यांना यावेळी केला.
रात्रीच्या अंधारात हे पाप झाला आहे. पण शिवसेना ही खंबीर आहे. असा विश्वास व्यक्त केला.
अजित पवारांसह जे लोक सोबत गेले त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाला काळ फासला आहे.
तसेच या सगळ्या घडामोडीशी शरद पवारांचा काही ही हात नाही. असेही स्पष्ट केले.