उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नवी जबाबदारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नवी जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार यांची वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेच्या सभागृहाच्या नेतेपदी निवड झाली आहे.
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली.
तसेच याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन ट्विट केलं आहे.
अजित पवार यांच्या आधी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई हे विधानपरिषदेचे नेते होते.
तसेच तालिका अध्यक्षांची देखील घोषणा केली आहे.
तालिका अध्यक्षपदी शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया, राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, भाजपचे अनिल सोले तसेच शिक्षक आमदार दत्तात्र्य सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान आजपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन महिनाभर चालणार आहे. तर एकूण १८ दिवस कामकाज चालणार आहे.
संपूर्ण कर्जमाफी तसेच अन्य मागण्यांसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच आंदोलन
या अधिवेशनादरम्यान ६ मार्चला २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.