‘या’ प्रकरणी अजित पवारांची चौकशी सुरू, पवारांसमोर 57 प्रश्नांची प्रश्नपत्रिका
विदर्भातील कोट्यावधी रुपयांच्या सिंचन घोटाळयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची चौकशी करण्यात आली असून चौकशी अधिकाऱ्यांनी अजित पवार यांना सत्तावन्न प्रश्न विचारून त्यावर लेखी उत्तर मागितले होते.

अजित पवार यांनी 16 सप्टेंबर रोजी त्यापैकी 52 प्रश्नांची उत्तरे सादर केली आहेत. उर्वरित पाच प्रश्नांच्या उत्तरांसाठी त्यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवली असल्याने त्या प्रश्नांची उत्तरे माहिती आल्यानंतर देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे. सिंचन घोटाळ्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप असल्याने अजित पवारांवर सध्या चौकशी सुरू आहे ही सगळी कारवाई संपल्यानंतर 20 नोव्हेंबर पासून अंतिम सुनवाईला सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी देखील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी एमआरए पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल २५ हजार कोटींचा हा घोटाळा केला असल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी शरद पावारांनाही ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती.