Mon. Feb 24th, 2020

राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन उमेदवारांचा प्रचार करू नका – अजित पवार

अजित पवारांच्या या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादीच्या या दोन्ही उमेदवारांची गोची झाली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात अनेक घडामोडी घडल्या. सोलापूर जिल्हयात मात्र राष्ट्रवादीमधून करमाळा आणि सांगोला येथून उमेदवारी दाखल केलेल्या माजी आमदार दीपक साळुंखे आणि संजय पाटील घाटनेकर या दोन आधिकृत उमेदवारांचा पराभव करण्याची व्ह्युरचना चक्क अजित पवार यांनी केलीय.आपल्याच उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेण्याची नामूष्की ओढवली आहे.

अजित पवारांच्या या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादीच्या या दोन्ही उमेदवारांची गोची झाली आहे. दीपक साळुंखे यांना घरचा आहेर मिळाल्याने त्यांनी फोन ही उचलणे आता बंद केले आहे.तर घाटनेकर यांनी आपण निवडणूक लढवणारच असा निर्धार केला आहे.

करमाळा आणि सांगोल्यातील राष्ट्रवादीच्या उमेदारांचा राष्ट्रवादी पक्षाशी कोणताही संबंध नाही. असे स्पष्ट करत करमाळयातील अपक्ष उमेदवार संजय शिंदे आणि सांगोल्यातील शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुखांना राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याचे जाहीर केल्याने घड्याळाच्या उमेदवारांवर वाईट वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *