‘सुजयला माझ्यासमोर आणा…’, अजित पवार यांचा गौप्यस्फोट

सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसला आहे. सुजय विखे पाटील हे कोणी मास लीडर नसल्याने त्यांच्या जाण्याने काही फरक पडत नाही, अशा स्वरूपाची प्रतिक्रया जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून येतच असली, तरी सुजय विखे पाटील यांच्याबद्दल गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
अहमदनगरच्या जागा वाटपामुळे सुजय विखे पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची सर्वत्र चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेच सुजय विखे पाटील य़ांच्यावर नगरची जागा सोडण्यासंदर्भात दबाव आणल्याचंही सांगण्यात येत होतं. मात्र अजित पवार यांनी वेगळाच गौप्यस्फोट केला आहे.
सुजय यांनी ‘ती’ ऑफर नाकारली
आपण सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती.
आपण स्वतः राष्ट्रवादीचं तिकीट देऊन सुजय यांना निवडून आणण्याची जबाबदारी घ्यायला तयार होतो.
मात्र सुजय यांनी ही ऑफर नाकारली.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपला प्रचार करणार नाहीत, अशी शंका सुजय यांना होती.
सुजय यांनी प्रस्ताव नाकारल्यामुळे आमचा नाइलाज झाला.
सुजयला माझ्यासमोर आणा…
मी सांगतो, सुजयला माझ्यासमोर आणा. हे जर खोटं असेल, तर म्हणाल ते करायची माझी तयारी आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, की अजित पवार खरंच बोलतात.
संबंधित बातमी- “जे आपल्या आई वडिलांचे ऐकत नाही ते जनतेचं काय ऐकणार?” अजित पवार यांचा टोला!
का घेतली शरद पवार यांनी माघार?
शरद पवार यांनी हवेची दिशा पाहून माढ्यातून माघार घेतली असल्याची चर्चा आहे. याबद्दल बोलताना अजित पवार यांनी हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलंय. राज्यसभेची मुदत 2020 पर्यंत आहे. ती जागा विनाकारण दुसऱ्यांना द्यावी लागू शकते. याचाच विचार करून पवार यांनी माघार घेतली असू शकते, असा अंदाज अजित पवार यांनी व्यक्त केला.
पाहा- दिलखुलास सुजय विखे-पाटील
पार्थची उमेदवारी कार्यकर्त्यांच्या मागणीवरून!
पार्थ पवार यांना मावळच्या जागेसाठी उभं करण्याचा निर्णय सर्वांच्या मागणीचा विचार करूनच केलेला होता.
पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी यासाठी मागणी केली होती.
शेकापच्या नेत्यांनीही पार्थच्या नावाचा आग्रह धरला होता.
त्याचाच विचार करून पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातमी- सुजय विखे-पाटलांचा भाजपात प्रवेश