…तर कायदेशीर कारवाई केली जाईल, अजित पवारांनी ठणकावलं

कोरोना विषाणूमुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना क्षेत्रांना वगळण्यात आलं आहे. या अत्यावश्यक सेवेत पोलीस, वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच घटकांचा समावेश होतो.
मात्र या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्लाच्या घटना अजिबात सहन केलं जाणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे ठणकावलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कर्तव्य बजावणारे पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असं अजित पवार यांनी बजावून सांगितंल आहे.
पोलिसांवर तसेच डॉक्टरांवर वसई, बीड आणि मालेगाव या ठिकाणी मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा नियमित सुरु आहे, असल्यांच अजित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होत असलेली गर्दी चिंताजनक असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
तसेच अजित पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थानला जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्यासंदर्भात नियोजन करण्याचे आदेश दिले आहे. अशा प्रकारची घरपोच सेवा वाई, बारामती शहरांत अशी व्यवस्था केली असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.
स्वयंसेवी संस्थांनी पुढं यावं – अजित पवार
राज्यातील विविध जिल्ह्यातून शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी स्थलांतर करुन आलेले असतात. तसेच बेघर असलेल्यांवर संचारबंदीमुळे खाण्यापिण्याची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी स्वंयसेवी संस्थेनी भोजनाची सोय करुन देण्यासाठी पुढं यावं, असं आवाहन केलं आहे.
स्वयंशिस्त, संयम पाळावा
पोलिसांनी आणि नागरिकांनी दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळण्याचे आवाहन अजित पवारांनी केली आहे.