Jaimaharashtra news

“लक्ष्मी बॉम्ब” या चित्रपटातला अक्षय कुमारचा फर्स्ट लूक

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमार यांच्या आगामी चित्रपट “लक्ष्मी बॉम्ब”  या चित्रपटाची  जोरदार चर्चा सुरु आहे. चाहत्यांना ही ‘लक्ष्मी बॉम्ब’  या चित्रपटाची उत्सुकता आहे. नवरात्रीचं निमित्त साधत अभिनेता अक्षय कुमारनं चित्रटातील एक फोटो फॅन्ससोबत शेअर केला आहे. दुर्गेच्या मूर्तीपुढे अक्षय कुमार लाल साडी आणि ठसठशीत कुंकू लावून उभा आहे.

अक्षय कुमारचा फर्स्ट लूक

‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

एप्रिल महिन्यातच या चित्रपटाची शुटींग सुरु झाली होती. हा चित्रपट तमिळ कॉमेडी भयपट “कंचना” चा रिमेक आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ पुढच्या वर्षी 5 जूनला रिलीज  होणार आहे. अक्षय कुमारनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.

त्याने असं लिहिलं आहे की, “नवरात्र म्हणजे तुमच्या आतल्या देवीला नमन करण्याचा आणि तुमच्यातील असीम शक्ती साजरी करण्याचा उत्सव, याच मंगलमय मुहूर्तावर ‘लक्ष्मी बॉम्ब’ या माझ्या आगामी चित्रपटातील माझा लुक शेअर करत आहे. या भूमिकेसाठी मी उत्साही सुद्धा आहे आणि नर्व्हस सुद्धा, परंतू ज्या क्षणी तुम्ही तुमच्या आयुष्यातील कम्फर्ट झोन मोडता त्याच क्षणी तुमचं खरं आयुष्य सुरु होतं. नाही का? असं म्हणतं त्यानी फोटो शेअर केला आहे.

Exit mobile version