Thu. Apr 15th, 2021

गंगुबाई काठियावाडी वादांच्या भोवऱ्यात

बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चित्रपटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कारण या चित्रपटाला विरोध होत असल्याचं समजलं आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि चित्रपटाचे लेखक यांना मुंबईतील माझगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे. याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे की, ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात त्यांच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे. असं गंगुबाई काठियावाडी यांच्या मुलाने केली आहे. बाबू रावजी शाह असं त्यांच्या मुलाचे नाव असून हा गंगूबाई काठियावाडी यांचा दत्तक घेतलेल्या चार मुलांपैकी एक असल्याचा दावा बाबूने केला आहे. या चित्रपटामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी होत असल्याचं त्याने या याचिकेत म्हटले आहे. मुंबईच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी या सर्वांना २१ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. हा चित्रपटात ‘गंगुबाई काठियावाडी’यांच्या जीवनावर आधारित असून ‘गंगुबाई काठियावाडी’‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातील कथा आहे. शिवाय हे पुस्तक हुसैन जैदी यांचे आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आलिया भट्ट ही रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि विक्रांत मेसी हे देखील मुख्य भूमिका असणार आहे. हा चित्रपट ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *