हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काउंटर

हैदराबाद : दिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले आहे. या चारही आरोपींना चौकशीसाठी घटनास्थळी घेऊन जाण्यात येत होते.
या दरम्यान आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपी पळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या. ही घटना आज रात्री ३ वाजता घडली.
बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. तसेच देशभरातून या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.