भाजप-सेना पुन्हा एकत्र; मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत घोषणा

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष सज्ज झाली आहेत. भाजप आणि शिवसेनेची युती होणार का ? या प्रश्नाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती झाली असल्याची घोषणा केली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
भाजप- सेनेचे महत्तवाचे निर्णय काय ?
भाजप- सेना पुन्हा एकत्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुक लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
त्याचबरोबर, जागावाटपाच्या फॉर्म्युलाचाही या पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली.
लोकसभेसाठी शिवसेना २३ तर भाजपा २५ जागांवर लढणार.
तसेच विधानसभेमध्ये ५०-५०चा फॉर्म्युला मान्य करण्यात आला आहे.
मित्रपक्षांना जागावाटपकरुन उरलेल्या जागांसाठी ५०-५०चा फॉर्म्युलाने वाटप होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाणार प्रकल्प रद्द केल्याचीही घोषणा केली .
जिथे लोक मान्यता देतील तिथेच प्रकल्प उभारणार असेही म्हटलं आहे.
शेतकऱ्याच्या तक्रारी निवारण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणार
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा शिवसेनेचा आग्रह असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
तसेच युतीमुळे गरीबांचे हित असल्याचे ते म्हणाले.