Jaimaharashtra news

६५ वर्षांच्या आजोबांनी कर्ज घेऊन केलं व्हेंटिलेटर दान

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेने कोविड रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय उपकरणांच्या मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अंबरनाथ येथील मोहन कुलकर्णी या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने आपल्या निवृत्तीवेतनातून एक व्हेंटिलेटर दान केले आहे. त्यांच्या या योगदानाचे सर्वत्र कौतून होत असून इतरांनाही यामुळे मदतीची प्रेरणा मिळत आहे.

मोहन कुलकर्णी सन २०१२ मध्ये अंबरनाथमध्ये असलेल्या बोरेक्स मोरारजी कंपनीमधून सेवानिवृत्त झाले. काही दिवसांपूर्वी अंबरनाथ नगरपालिकेने कोविड रुग्णालयासाठी मदतीचे आवाहन केले होते. इतकेच नव्हे, तर व्हेंटिलेटर दान करण्यासाठी अडीच लाखांचे कर्जदेखील घेतले आहे. एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचे हे व्हेंटिलेटर आहे. इतरांनाही यामुळे मदतीची प्रेरणा मिळावी असे मत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी व्यक्त केले.
कुलकर्णी यांच्या पत्नीचा कॅन्सरने मृत्यू झाला असून आपल्या पत्नीच्या नावे आपण गरजवंतांना मदत केली पाहिजे, या हेतूने कोरोनाकाळात मदतीसाठी खारीचा वाटा उचलावा, या भावनेने ही मदत केल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं.

Exit mobile version