Fri. May 14th, 2021

अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा धक्का, टेररिझमचा अहवाल प्रसिद्ध

वृत्तसंस्था, अमेरिका

 

दहशतवाद्यांविरोधात कोणत्याही कारवाया न करणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेनं मोठा धक्का दिला आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश करण्यात आला.

 

अमेरिकी परराष्ट्र खात्याने ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझमचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी नंदनवन असल्याचं म्हणण्यात आलं.

 

लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दोन दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानात प्रशिक्षण शिबिरं चालवली, तसंच विविध मार्गानी निधीसंकलनही केलं.

 

पाकिस्तान सरकारनं मात्र त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली. इतकंच नव्हे, तर अफगाण तालिबान किंवा हक्कानी गटाविरोधात परिणामकारक कारवाई करण्यास पाकिस्तानानं टाळाटाळ केल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं.

 

पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा दावा भारतानं वारंवार केला. त्यामुळे भारताच्या या दाव्याला अमेरिकेनं अप्रत्यक्ष दुजोराच दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *