Thu. Jul 16th, 2020

महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या 9 तर अमित शाहांचा 18 सभा   

विधानसभा निवडणुक अगदी तोंडावर आली आहे. ज्या त्या पक्षाचे उमेदवार देखील ठरले आहेत. त्यानुसार राजकीय पक्षाने प्रचाराला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीही महाराष्ट्रात सभा घेत आहेत. त्यांच्या महाराष्ट्रात नऊ  सभा घेणार आहेत. तर गृहमंत्री अमित शाह 18 सभा घेणार आहेत. त्यामुळे भाजपाकडून विधानसभेचा जोरदार प्रचार होणार हे नक्की. मुंबई, पुणे, सातारा, जळगाव मध्ये या सभा  होणार आहेत.

महाराष्ट्रात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सभा

विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  राज्यात 9 आणि  गृहमंत्री अमित शाह यांच्या 18 सभा होणार आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नऊ पैकी दोन सभा पश्चिम महाराष्ट्रात होणार आहेत.  यामध्ये एक सभा सातारा आणि दुसरी पुण्यात होईल. दोन्ही सभा एकाच दिवशी  होणार आहेत.
17 ऑक्टोबरला सातारा आणि पुण्यात सभा, पुण्यातील सभेचं ठिकाण अजून निश्चित नाही.  18 ऑक्टोबरला मुंबईत  सभा होणार आहे.
13  ऑक्टोबर पासुन होणार पहिल्या सभेला जळगावातून  सुरुवात होणार आहे. 13 ऑक्टोबरला साकोली येथे सभेचे आयोजन केले आहे.
16  ऑक्टोबर अकोला, परतुर आणि पनवेल  येथे सभा होणार आहे. 17   ऑक्टोबरला पुणे आणि साताऱ्यामध्ये तर 18 ऑक्टोबरला मुंबईमध्ये सभा होत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *