सॅम पित्रोदांचं विधान पूर्णपणे चुकीचं – अमित शहा

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक सभा, बैठका, पत्रकार परिषदा होत आहेत.सॅम पात्रोडाच्या विधानावर राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे असं म्हणतं शहीद झालेल्या जवानांच्या रक्तावर राजकारण का केले जात आहे. असा सवाल भाजपाचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष भाजपाचे अमित शहा यांनी केला आहे . दिल्लीत अमित शहा यांची पत्रकार परिषद झाली यावेळी ते बोलत होते. सॅम पात्रोडा यांनी एअर फोर्सच्या कामगिरीवर विधान केले आहेत ते पुर्णपणे चुकीचे आहे.असं अमित शहा म्हणाले आहेत.
काय म्हणालेत अमित शहा ?
देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी दहशतवादाशी भाजप लढू शकते.
राहुल गांधी यांना एअर फोर्सच्या कामगारीवर संशय आहे का ? असा सवाल ही त्यांनी केला आहे.
शहीदांच्या कुंटूबाची आणि देशाच्या सैनिकांची राहुल गांधी यांनी माफी मागावी.
सॅम पत्रोद्राचे विधान पुर्णपणे चुकीचे असून त्यांनी देशाच्या सैनिकांची माफी मागितली पाहिजे.
सॅम पात्रोडाच्या विधानावर राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे.
शहीद झालेल्या जवानांच्या रक्तावर राजकारण का केले जात आहे.
पुलवामामधील घटना लहान आहे का हे कॉँग्रेसने स्पष्ट करावे ?
पुलवामाच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे कनेक्शन नाही का ?
असे सवाल अमित शहा यांनी विचारले आहेत. दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात ते बोलत होते.