सोलापुरात अमित शाह यांची ‘ही’ मोठी घोषणा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक युतीत प्रवेश करत असून यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. महाराष्ट्राचा विकास मोदी-फडणवीसांमुळे झाला असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा संधी द्या असे म्हणत मोठी घोषणा केली आहे. 1 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे नेते धनंजय महाडिक, कॉंग्रेसचे नेते जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
काय म्हणाले अमित शाह ?
अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा संधी द्या अशी मोठी घोषणा केली आहे.
पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोदींनी कलम 370 हटवून एकतेचा संदेश दिला
विरोधकांच्या सरकारमुळे देशाची दुरवस्था
मोदी-फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास
राष्ट्रवादी-कॉंग्रेस मोठा भ्रष्टाचार केला
सिंचनामध्ये 74 हजार कोटींचा घोटळा केला
शरद पवारांनी मागील 15 वर्षात काय केलं याचा हिशोब द्यावा
शरद पवार यांनी महाराष्ट्रसाठी काय केलं ?.
राष्ट्रवादीत फक्त शरद पवार राहतील