बॉलिवूडच्या शहंशाहने हटके अंदाजात दिल्या अभिषेकला शुभेच्छा
अभिषेकचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ साली झाला…

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आज ५ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. अभिषेक त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी अभिषेकला सोशल मीडियावर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या. मात्र बॉलिवूडच्या शहंशाह म्हणजेचं अभिनेता अमिताभ बच्चन यांनी जरा हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहे. अमिताभ यांनी एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंवरून शेअर केला आहे. हा फोटो दोन फोटोंचे कोलाज आहे. एका बाजूला अमिताभ यांनी अभिषेकचा हात पकडला आहे. तर दुसऱ्या फोटोत अभिषेकने अमिताभ यांचा हात पकडला आहे. या कोलाजवर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असे त्यांनी लिहले आहे.
या फोटोला कॅप्शन देत अमिताभ म्हणाले की, “कधी काळी मी त्याचा हात पकडून त्याला रस्ता दाखवायचो, परंतू आता तो माझा हाथ धरतो आणि मला रस्ता दाखवतो.” हा फोटो कोणत्या तरी पुरस्कार सोहळ्याचे असल्याचे दिसत आहे. काही दिवसापुर्वीच अभिषेक बच्चन याचा ‘लुडो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. ‘लुडो’ या चित्रपटात अभिषेकने साकारलेल्या भूमिकेची सगळ्यांनी प्रशंसा केली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता लवकरच अभिषेकचा ‘बॉब बिस्वास’ हा चित्रपट झळकणार आहे. या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याने या चित्रपटासाठी १२ किलो वजन वाढवले आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी त्याचा या चित्रपटातील लूक समोर आला होता. त्यानंतर या लूकमुळे अभिषेक हा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला होता.