Mon. Jan 17th, 2022

अमरावतीत मेळघाटात मुसळधार पाऊस, 40 गावांचा संपर्क तुटला

अमरावती जिल्ह्यात सुरु असलेल्या सार्वत्रिक पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अमरावतीतील मेळघाट परिसरात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने ४० गावांचा मुख्यालयाची संपर्क तुटलेला आहे

अमरावती जिल्ह्यात सुरु असलेल्या सार्वत्रिक पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. पाऊस कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पाऊस सुरू असल्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत तर अंजनगाव सुर्जी येथील शहानुर धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 5 सेमीने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावतीतील मेळघाट परिसरात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने ४० गावांचा मुख्यालयाची संपर्क तुटलेला आहे

40 गावांचा संपर्क तुटला!

अमरावतीतील मेळघाट परिसरात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने 40 गावांचा मुख्यालयाची संपर्क तुटलेला आहे. मेळघाटातील शिपना, तापी, गडगा नदीला पूर आल्याने या ठिकाणची वाहतूक थांबविण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात विदर्भात मुसळधार पाऊस हवामान खात्याने वर्तवल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सालबर्डी आणि मध्यप्रदेश मधील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मध्यप्रदेश मधून वाहणाऱ्या जाम नदीला पूर आल्याने अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या या जलाशयात ३३% जलसाठा आहे.

पावसाळ्याच्या पूर्वी याच धरणात केवळ 10% टक्केच जलसाठा शिल्लक होता.परंतु जलसाठा वाढत असला तरी मागील वर्षी याच तारखेला या धरणात ४५.७१% इतका जलसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत अध्यापही १२.७१% तुट आहे. दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पाऊस सुरू असल्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत तर अंजनगाव सुर्जी येथील शहानुर धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

5 सेमीने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावतीतील मेळघाट परिसरात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने ४० गावांचा मुख्यालयाची संपर्क तुटलेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *