Thu. Apr 22nd, 2021

अमरावतीत थंडीचा जोर वाढला

अमरावती : दरवर्षीच्या तुलनेत हिवाळा उशिरा सुरू झाला असला तरी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा जोर वाढला आहे. अमरावतीमध्ये ११ अंश सेल्सियस पेक्षा तापमान खाली घसरत असल्याने ग्रामीण भागातील लोकांना थंडीची हुळहुळी भरली आहे.

पहाटे धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून गप्पा मारताना दिसत आहेत. वाढलेल्या थंडीमुळे सकाळी फिरणाऱ्यांची संख्या देखील कमी होत आहे.

तर सकाळच्या वेळी तोंडाला कापड बांधून नागरिक घराबाहेर निघात आहेत. याच थंडीचा फायदा रब्बी पिकाला देखील फायदेशीर ठरत आहे.

कन्याकुमारी मालदीव पट्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येमेन किनारपट्टीवर पवन नामक वादळ सक्रिय असल्याने हवेच्या दिशेत बदल झाला आहे.

त्यामुळे वाऱ्याची दिशा उत्तरेकडे असल्याने थंडीचा जोर वाढला आहे. पुढील ४ ते ५ दिवस थंडीचा जोर विदर्भात कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *