अमरावती जिल्हा परिषदेवर महविकास आघाडीचा झेंडा

अमरावती जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीने पुन्हा एकदा सत्तास्थापन केली आहे. अमरावतीच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी कॉंग्रेसच्या बबलु देशमुख तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या विठ्ठल चव्हाण यांची बिनवरोध निवड झाली आहे.
अमरावती जिल्हा परिषदेची 59 सदस्यसंख्या होती.
विधानपरिषदेवर बळवंत वानखेडे आणि देवेंद्र भुयार निवडून गेले आहेत. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेची संख्या ५७ इतकी आहे.
बहुमतासाठी 29 ही मॅजिक फिगर होती. मात्र काँग्रेसचे 35 पेक्षा जास्त सदस्य संख्या जुळले. त्यामुळे भाजपने निवडणुकीतून आधीच माघार घेतली.
त्यामुवळे ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यास कॉंग्रेस नेते यशस्वी झाले.
राज्यात तसेच जिल्ह्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने जिल्ह्याचा झपाट्याने विकास होईल, अशी आशा मंत्री यशोमती ठाकुर यांनी व्यक्त केली.
या निवडणुकीत महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकुर,माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
मात्र जिल्हा परिषदेवर सत्ता राखून कॉंग्रेस ने पुन्हा आपल वर्चस्व सिद्ध केलं आहे.
यावेळी महाविकास आघाडीच्या समर्थकांनी नाचून विजय साजरा केला.
