…तर मी देखील सोशल मीडिया सोडणार – अमृता फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री ट्विट करुन सोशल मीडिया सोडणच्या विचारात असल्याचं ट्विट केलं. मोदींच्या या ट्विटमुळे देशभरात एकच अनेक चर्चांना उधाण आलं.
मोदींच्या या ट्विट पाठोपाठ विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नरेंद्र मोदींच ट्विट रिट्विट केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार ?
काय म्हणाल्या अमृता फडणवीस ?
कधी कधी लहान निर्णय देखील आपलं आयुष्य बदलणारे ठरतात. मी माझ्या नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवेन, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
अमृता फडणवीस या सोशल मीडियावर फार एक्टिव्ह असतात. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री यांच्यावर टीका केली होती.