Sun. Apr 5th, 2020

महाराष्ट्रातील ‘हे’ गाव न्यारं, इथं सामाजिक सलोखा अन् प्रेमाचं वारं !

माधव दिपके, हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील हापसापूर हे गाव 800 ते 1000 लोकसंख्या असलेलं हे गाव. मात्र या गावाचा आदर्श घ्यावा, असं हे गाव आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यांमध्ये हे गाव आहे. या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरिक सामाजिक सलोखा जोपासतात. त्यामुळे कोणतेही वाद-विवाद किंवा जातीय तेढ या गावांमध्ये दिसून येत नाही.

अनेक दिवसापासून गावातील एकही तक्रार पोलीस स्टेशनला जात नाही. त्यामुळे या गावाला तंटामुक्ती पुरस्कारही दिला आहे. विशेष म्हणजे गावांमध्ये ग्रामपंचायत असो सोसायटी असो किंवा शाळा व्यवस्थापन समिती असो या सर्व निवडणुका या बिनविरोध आहेत.

गावामध्ये बौद्ध आणि मराठा या दोनच समाजाचे लोक राहतात.

विशेष म्हणजे गावात कोणाच्याही घरी सुख दुःखाचा कार्यक्रम असो गावातील सर्व नागरिक म्हणजे दोन्ही समाजातील सर्व नागरिक सहभागी होतात.

गावातील कार्यक्रमांमध्ये सर्व नागरिकांची उपस्थिती लागते.

विशेष म्हणजे गावातील वाद तंटे गावातच मिटविले जातात. त्यामुळे पोलीस स्टेशनकडे तक्रार घेऊन जाण्याची गरज नागरिकांना पडत नाही. गावांमध्ये अशा पद्धतीने कोठेही वाद नसल्यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळत आहे. गाव खूप चांगल्या पद्धतीने विकसित झाल्याचे चित्र आहे. अशा पद्धतीने सामाजिक सलोखा जपत कोणतीही जातीय तेढ मनात न ठेवता सर्व नागरिक एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतात.

या गावाला जर आमदारांनी दत्तक घेतले तर नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. या गावाचे या पद्धतीचे वर्तन पाहून संपूर्ण महाराष्ट्राने या गावाचा आदर्श घ्यावा असं चित्र या गावाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *