Wed. Jan 19th, 2022

हवालाप्रकरणी आनंदराव अडसुळांना दिलासा नाहीच

शिवसेनेचे माजी खासदार आंनदराव अडसूळ यांना मनी लॉंड्रिंगप्रकरणी उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही. उच्च न्यायालयाने आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

मनी लाँड्रिंगप्रकरणी आनंदराव अडसूळ यांना सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स बजावण्यात आले होते. त्यासाठी अटकेच्या भीतीपोटी अडसूळांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन सादर केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला असल्यामुळे त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. यापूर्वीही मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानेही आनंदराव अडसूळ  याना दिलासा देण्यास नकार दिला होता.

आनंदराव अडसूळ सिटी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष असताना त्यांनी खातेधारकांचे पैसे बेकायदेशीरपणे बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले आहे. याप्रकरणी नऊशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी केली होती. त्यामुळे याप्रकरणी अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर अटकपूर्वी जामीनासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानेही आनंदराव अडसूळ  याना दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंर त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी झाली असून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *