Wed. Dec 1st, 2021

जेव्हा ‘1 दिन का CM’ भेटतो ‘PM’ ना!

नुकतीच Bollywood अभिनेता अनिल कपूरने PM नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याच भेटीचे फोटो सध्या social media वर viral होत आहेत. मोदी यांच्या सोबतचा एक photo स्वत: अनिल कपूर यांनी शेअर केला आहे. अनिल कपूर आणि मोदींच्या भेटीमुळे अनेक चर्चांना सुरुवात झाली.

मोदींच्या आणि अनिल कपूर यांच्या भेटीमागील कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र नुकताच अनिल कपूर यांनी भेटीमागील कारणाचा उलगडा केला आहे.

कसा होता अनिल कपूरचा अनुभव?

अनिल कपूर यांनी अनुभव व्यक्त करताना सांगितले की, “ PM नरेंद्र मोदी यांची भेट घेणं ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी संधी होती. या भेटीचे क्षण खरंच खूप अप्रतिम होते. मागील अनेक वर्षांपासून मला मोदींना भेटण्याची इच्छा होती. खरंतर मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळीच मला त्यांना भेटायचं होतं पण कधी योग आला नाही. यावेळी योग जुळून आला. काही भेटी या नशिबाने ठरवलेल्या असतात त्याचवेळी होतात, ही भेट त्यातीलच एक आहे.”

“भारतीय सिनेसृष्टी विषयी, सिनेमांविषयी आमच्यात बराचवेळ चर्चा झाली. PM मोदींची भेट ही माझ्यासाठी कायम एक अविस्मरणीय भेट राहील”, अशी भावनाही अनिल कपूर यांनी केली.

कार्तिकने शेअर केलेल्या ‘बॅकफी’वर पंतप्रधान मोदींनी दिला ‘हा’ भन्नाट रिप्लाय

अवघं बॉलिवूड मोदी भेटीसाठी उत्सुक!

या आधीही दिल्लीमध्ये बॉलिवूडच्या काही कलाकारांच्या टीमने मोदींची भेट घेतली होती. यात अनेक निर्माते, दिग्दर्शक, बॉलिवूड स्टार्स सहभागी होते. करण जोहर, आलिया भट्ट, रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, एकता कपूर, रणवीर सिंग, विकी कौशल, आयुषमान खुराना, रोहित शेट्टी इत्यादी बॉलिवूडचे नामी कलाकार मोदींना भेटले होते.

लवकरच अनिल कपूर अभिनित ‘टोटल धमाल’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यापूर्वी ‘नायक’ या सिनेमात अनिल कपूरने 1 दिवसाच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका केली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *