अनिल शिदोरेंकडून मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा

मनसेच्या १४ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला नवी मुंबईत सुरुवात झाली आहे. नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
या कार्यक्रमादरम्यान मनसेच्या बहुप्रतिक्षित शॅडो कॅबिनेटची घोषणा केली आहे.
मनसेच्या अनिल शिदोरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली आहे.
असं आहे मनसेचं शॅडो कॅबिनेट
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी मनसेकड़ून शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय आणि जलसंपदा विभागाचं अपवाद वगळता प्रत्येक विभागाची जबाबदारी ही दोन किंवा त्यापेक्षा अधिक जणांना देण्यात आली आहे.
गृह, विधी न्याय जल – बाळा नांदगावकर, किशोर शिंदे ,संजय नाईक, राजीव उंबरकर, राहील बापट, अवधूत छावणी योगेश खैरे, प्रसाद सारफरे डॉ अनिल गजने, जमील देशपांडे
जलसंपदा- अनिल शिदोरे
माहिती व तंत्रज्ञान- अनिल शिदोरे, अमित ठाकरे
वित्त आणि नियोजन – नितीन सरदेसाई, हेमंत संबुस, वसंत फडके, मिलिंद प्रधान, पियुष छेडा, वल्लभ , अनिल शिदोरे, अबिनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कणाल माईंकर, अभिजित, श्रेधार जगताप
ऊर्जा- शिरीष सावंत, मंदार हळबे, सागर देवरे, विनय भोईटे
ग्रामविकास- जयप्रकाश बाविस्कर, अमित ठाकरे, परेश भोईर
नगरविकास- संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येउरकर, संदीप कुलकर्णी, फारुख लाला
महिला व बालविकास – सुनीता चुरी, शालिनी ठाकरे
सामाजिक न्याय- गजानन काळे
सार्वजनिक आरोग्य- रिता गुप्ता, कुंड राणे
सहकार आणि पानं- वल्लभ चित्रे,
वने, आपत्ती- संजय चित्र, अमित ठाकरे, वाफगेश सारस्वत, संतोष धुरी, आदित्य दामले
शिक्षण- अभिजित पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, बिपीन नाईक, अमोर रोज
कामगार- गाजनन राणे सुरेंद्र सुर्वे