Mon. Jun 14th, 2021

जेलमध्ये समीर भुजबळांना शहाळ्यातून व्होडका पुरवला जातो; अंजली दमानियांचे खळबळजनक आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

छगन भुजबळांना व्हीआयपी ट्रिटमेंट देत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.

आर्थर रोड जेलमध्ये भुजबळांची शाही बडदास्त ठेवली जाते. याप्रकारचं पत्रच दमानियांनी अतिरिक्त कारागृह संचालकांना पाठवले.

भुजबळांना कोणत्या प्रकारची व्हीआयपी ट्रिटमेंट मिळते याची लिस्टच त्यांनी या पत्रात दिली. भुजबळांच्या या शाही सोयी रद्द कराव्यात आणि त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी

अंजली दमानियांनी या पत्रातून केली. 

 

अंजली दमानियांचे खळबळजनक आरोप 

 

– आर्थर रोड जेलमध्ये भुजबळांना टीव्हीची सोय

– हिंदी चित्रपट पाहण्यासाठी भुजबळांना टीव्ही पुरवला

– भुजबळांची आवडती डिश ‘चिकन मसाला’ जेलमध्ये पुरवली जाते

– छगन भुजबळांना दर 2 तासांनी ताजी फळं दिली जातात

– शहाळ्यातून समीर भुजबळांना व्होडका पुरवला जातो

– समीर भुजबळला सकाळी बोलण्यासाठी 3 तास दिले जातात

– आर्थर रोड जेलमधले मोबाईल जॅमरशीही तडजोड केली जाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *