Mon. Jul 6th, 2020

पाण्याच्या समस्येवर सोशल माध्यमातून उपाययोजना; बुलडाण्यातील तरुणांचा संकल्प

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

तरुणाई सध्या सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असते. पंरतु, आजही अनेक तरुण या सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी काम करत असतात. त्याचीच प्रचिती आली ती बुलडाण्यात! मातोळा तालुक्यातल्या आव्हा गावातील तरुणांनी सोशल मीडियाचा सदुपयोग केलाय.

व्हॉट्स ॲप ग्रुपवरुन तरुणांनी आपल्या गावातील विहीरी गाळमुक्त करण्याची मोहीम हाती घेतलीय. या मोहिमेला आता तरुणांनी सुरुवातही केलीय. गावातील पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना तरुणांनी व्हॉट्स ग्रुप तयार करुन उपाययोजनांवर चर्चा केली. मातृभूमी आव्हा नावाच्या व्हॉट्स ॲप ग्रुप वर तरुणांनी विविध उपाययोजना सुचवल्या.

गावातील तिनही विहिरी गाळमुक्त केल्या पाहिजे, असे सर्वानुमते ठरलं. पाहता-पाहता यासाठी लागणारा निधीही उभा राहिला. तरुणांच्या पुढाकारांने तब्बल 60 हजारांचा निधी उभा करण्यात आला आणि मग गाळमुक्त विहीरी करण्याच्या मोहीमेला तरुणांनी सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *