Sun. May 9th, 2021

Big Boss फेम जोडी अनुप जलोटा आणि जसलीन मथारू एकाच चित्रपटात

भजन सम्राट अनूप जलोटा आणि जसलीन मथारू झळकणार रूपेरी पडद्यावर

Big Boss चं घर नेहमी चर्चेचा विषय असतो. BigBoss 12 मध्ये जोडीदार म्हणून संपूर्ण सीझन चर्चेचा विषय बनली अनुप जलोटा आणि प्रेयसी म्हणून घरात आलेली जसलीन मथारू लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.या चित्रपटाचे पोस्टर जसलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहे. तसेच या चित्रपटाबद्दल जसलीनने चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

Big Boss 12 तील चर्चीत जोडी जसलीन आणि अनुप जलोटा एकाच चित्रपटात –

Big Boss 12 मधील चर्चेची जोडी भजन सम्राट अनुप जलोटा आणि पंजाबी चित्रपटातील अभिनेत्री जसलीन मथारु यांचा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटाचे पोस्टर जसलीनने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आणि या चित्रपटाबद्दलची माहिती तिने तिच्या चाहत्यांना दिली.

या आगामी चित्रपटाचे नाव ‘वो मेरी स्टूडेंट है’आहे.

Big Boss 12 अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांनी भाग घेतला होता.

बिग बॉस शोमध्ये दोघांच्या कथीत प्रेमसंबंधांमुळे ते प्रचंड चर्चेचा विषय होते.

त्यानंतर बिग बॉस शोमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी कधीही उघडपणे आपल्या नात्याबद्दल खुलासा केला नाही.

हा चित्रपट हा अनूप जलोटा यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

या चित्रपटात अनुप जलोटा हे एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारणार आहे तर जसलीन ही विद्यार्थीनीच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

या चित्रपटाची पटकथा ही जसलीनच्या वडिल म्हणजेच केसर मथारु यांनी लिहली आहे. चित्रपटाचे चित्रिकरणाची सुरूवात १६ ऑगस्ट पासून होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *