Thu. Dec 2nd, 2021

विरुष्काने लेकीचं नाव ठेवलं वामिका

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मानी ११ जानेवारीला एका गोंडस मुलीला जन्म दिला. चिमुकलीच्या आगमनाने त्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला. तेव्हापासून विरुष्काच्या बाळाविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली होती की मुलीचं नाव काय ठेवण्यात येणार आहे. आता या चिमुकलीचा चेहरा पाहण्याची, तिचं नाव जाणून घेण्यासाठी चाहते हे आतूर झाले आहे. नुकतंच विरुष्काने त्यांच्या बाळाचं नाव जाहीर केल आहे. विशेष म्हणजे या बाळाचं नाव ऐकल्यानंतर काही चाहत्याच्या मनात नावामागचा नेमकं अर्थ काय आहे हा प्रश्न पडला आहे.

विराट आणि अनुष्काने त्यांच्या बाळाचं नाव वामिका असं ठेवलं आहे. खरं तर हे नाव ऐकल्यानंतर विराट आणि अनुष्का या दोघांचं नाव एकत्रित करुन वामिका हे नाव ठेवलं असावं असं चाहत्यांना वाटत होतं. मात्र, या नावाचा एक खास अर्थ आहे. दुर्गा हे देवीचं नाव आहे. वामिका या नावाचा खरा अर्थ म्हणजे देवी दुर्गा. विराट- अनुष्काच्या घरात एका चिमुकलीने आगमन केल्यामुळे ती देवीचं रुप आहे असं म्हणत त्यांनी या चिमुकलीचं नाव वामिका ठेवले आहे. नुकताच अनुष्काने विराट आणि तिच्या लेकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि सोबतच तिच्या बाळाचं नावदेखील जाहीर करत त्यांनी . “आमच्या मुलीने, वामिकाने आमचे आयुष्य एका वेगळ्याच स्तरावर नेले आहे! अश्रू, हसू, काळजी, आनंद या सगळ्या भावना काही मिनिटांच्या कालावधीत आम्ही अनुभवल्या आहेत” या आशयाचे ट्वीट अनुष्काने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *