Mon. Jul 13th, 2020

#Karnatakaelections2018: कर्नाटकच्या बाहुबलीसाठी आज मतदान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी हे मतदान होणार असून, सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.मतदानानंतर 15 मे रोजी म्हणजे मंगळवारी कर्नाटकची सत्ता कोणाकडे येणार हे कळेल.

कर्नाटक निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही लढत दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची असणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याप्रमाणेच कर्नाटकातील नेत्यांसाठीही ही निवडणुक तितकीच महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री सिद्धरमैय्या हे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत, तर भाजपमध्ये एल येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे.

कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 मतदारसंघात आज मतदान होणार असून, एकूण 4.98 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी 55 हजार 600 मतदान केद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक कर्मचारी कार्यरत आहेत.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *