Janata curfew : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्या – सफाई कामगार

देशासह राज्यात जनता कर्फ्युला सुरुवात झाली आहे. सकाळी ७ ते रात्री ९ एकूण १४ तास हा जनता कर्फ्यु असणार आहे. या जनता कर्फ्युला घरी बसून समर्थन देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधानांच्या याच आवाहनला प्रतिसाद द्या, असं आवाहन मुंबईतील सफाई कामागारांनी केलं आहे.
देशात जरी जनता कर्फ्यु असला तरी अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी (Cleaning Workers ) कामावर उपस्थित राहून आपली भूमिका बजावली आहे. तसेच त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे.
Janatacurfew : जनता कर्फ्युला सुरुवात, जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घरी बसण्याच्या आवाहनाला सकारत्मक प्रतिसाद देण्याचं आवाहन या सफाई कामागारांनी केलं आहे.
सफाई कर्मचाऱ्यांचं जनतेला आवाहन
आम्ही अत्यावश्यक सेवेत मोडतो. त्यामुळे आम्ही कामावर येऊन आमची जबाबदारी बजावली आहे. आम्ही देशसेवेसाठी आलो आहोत. आमची सुट्टी झाल्यावर आम्ही घरी बसून या जनता कर्फ्युला प्रतिसाद देणार असल्याचं सफाई कर्मचारी म्हणाले.
दरम्यान जनता कर्फ्युला राज्यातील जनता चांगला प्रतिसाद देत आहे. जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेमध्ये सामान्य नागरिकांना प्रवेश नसणार आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच ओळखपत्र पाहूनच रेल्वेत प्रवेश देण्यात येणार आहे.