गोव्यात मलायका आणि अर्जुन कपूर राहतात अमृता अरोराच्या बंगल्यात

अभिनेत्री मलायका सध्याला गोव्यात अर्जुन कपूरबरोबर व्यतीत करत आहे. अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मलायका अनेकदा अर्जुन कपूरसोबतचं वेगवेगळ्या पार्टीज आणि ठिकाणी दिसतात. मलायका आणि अर्जुनच नातं हे कोणाकडून लपलं नाही आहे. सध्याला मलायका आणि अर्जुन हे गोव्यामध्ये नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. हा बंगला अमृता अरोराचा आहे. शिवाय आजरा बीचजवळील आलिशान बंगल्यामध्ये त्यांचा मुक्काम आहे. हा अमृताचा हा बंगला फार सुंदर असून सोमवारी अर्जुन कपूरने गोव्यातील या बंगल्यामध्ये काढलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
“शकील लडाक आणि अमृता अरोरा तुम्ही खूपच सुंदर घर बांधले आहे. गोव्यात यापेक्षा चांगले हॉलिडे होम असू शकत नाही” असं कॅप्शन अर्जुनने या फोटोला दिले आहे. अर्जुनच्या या पोस्टवर मलायका आणि अमृता दोघींनी हार्टचा इमोजी टाकले आहे.
मलायका आणि अर्जुन सध्या गोव्यात एकत्र राहत आहे. त्यांनी नाताळ हा गोव्यात साजरा केला शिवाय सोशल मीडियावर अनेक वेळा मलायका आणि अर्जुन एमेंकाना कमेंट करत असतात. मलायका आणि अर्जुन हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. मलायका ही छोट्या पडद्यावर अनेक वेळा झळकत असते.