Tue. May 11th, 2021

शिवसेना नेत्यावर तुर घोटाळ्याचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तूर खरेदी होत नाही म्हणून राज्यभरातील सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शिवसेना नेत्यावर तुर घोटाळ्याचा आरोप होत आहे.

 

असं असतानाच शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर एकाच दिवशी 187 क्विंटल तूर खरेदी केल्याची माहिती मिळत आहे.

 

तर, त्यांचे भाऊ आणि भावजयीच्या नावावर 190 क्विंटल अशी तब्बल 377 क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

 

जालना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून सध्या जिल्ह्यातील संपूर्ण तूर खरेदीची चौकशी सुरू आहे.

 

जालना जिल्ह्यातील नाफेडच्या जालना, परतूर, तीर्थपुरी, अंबड अशा चार तूर खरेदी केंद्रांवर 9 हजार 568 शेतकऱ्यांकडून सुमारे 5 लाख 55 हजार क्विंटल तूर खरेदी

करण्यात आली.

 

दरम्यान, या तूर खरेदी केंद्रांवर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूर विक्री करून शासनाची फसवणूक केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. जालना जिल्ह्यात एवढी मोठी तूर

कुठून आली याची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली होती.

 

या समितीच्या चौकशीत जालना जिल्ह्यातील 800 शेतकऱ्यांची तूर खरेदी संशयास्पद आढळून आली. या यादीत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव दुसऱ्या आणि

तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

मात्र, आपली 400 एकर जमिन असल्यामुळे 377 क्विंटल तूर विकल्याचा दावा अर्जुन खोतकर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *